पाणीपुरी हा पदार्थ लोक खूपच आवडीने खातात आणि तो माझ्याही तितकाच आवडीचा आहे हा एक स्नॅक चा प्रकार मानला जातो लग्नात आणि इतर समारंभात आपल्याला पाणीपुरी सर्रास दिसेल टेस्ट खूपच चागली आणि नुसत्या वासानेच तोंडाला पाणी येत अशी आहे पाणीपुरी. कधीतरी आपल्या मनात हा प्रश्न आला का ? की ही पाणीपुरी तयार कशी झाली. अर्थात पाणीपुरीचा शोध कधी आणि कसा लागला, तर चला मग जाणून घेऊया यांच्याविषयी अधिक जाणून घेऊया.
पाणीपुरी काय आहे ?
पाणीपुरी एक स्नॅक्स मध्ये मोडले जाते यात आपल्याला मैद्यापासून बनलेल्या लहान पुऱ्यात तिखट आणि चविष्ट पाणी भरून मिळते यात भर म्हणून शिजलेल्या बटाट्याची भर आणि सोबत कांदा टाकतात कधी कधी यात मटकी सुद्धा वापरली जाते
पाण्यामध्ये काहीजण दोन पाणी बनवतात तिखट आणि गोड तर काहीजण हे एकच पाणी बनवतात
जे की तिखतगोड असते आता तर आत अनेक फ्लेवर मिळतात.
जे की एक स्ट्रीट फूड आहे
शोध कधी लागला ?
इथे आपल्याला चीनमधून आलेल्या काही चिनी प्रवाशांच्या प्रवासवर्णननात पाणीपुरीचे वर्णन सापडते.
पाणीपुरी चा पहिला उगम झाला तो गंगा नदीवर असलेल्या मगध शहरातून असे आपल्याला जुन्या लेखात सापडते. सुरुवातीला हा पदार्थ फक्त राजभोजमध्ये समाविष्ट होता आणि खूप दिवसांनी याची प्रसिध्दी वाढतच गेली आणि शेवटी आम जनतेतही तो प्रसिद्ध झाला आजपर्यंत यात अनेक बदल होत आलेत. जसे की सुरुवातीला फक्त पाणीपुरी नाही तर सोबत चिवडा आणि शेव देखील मिळत पाणीपुरी ही घरी आलेल्या पाहुण्यांना पाहुणचार म्हणून किंवा त्यांना इंप्रेस करण्यासाठी पूर्वीच्या काळात हा तयार केला जाई काळानुसार ते बदलत गेले आणि आजतर 10रू 6 गोलगप्पे मिळतात तरीही लोक आवडीने खातात.
याची एक आणखी अख्यायिका आहे ती अशी की, जेंव्हा पांडवाचा द्रोपदिसोबत विवाह झाला तेंव्हा ते पांडव द्रोपदिसोबत कुंती कडे गेले आणि तिथे द्रौपदीला एक टास्क मिळाला जो कुंतीने दिला की पाची पांडवांचे पोट भरले पाहिजे असे काहीतरी खायला बनव आणि तेंव्हा आपल्या बुध्दीचा वापर करत द्रौपदीने पाणीपुरी बनवली ही फक्त एक सांगता आहे याबद्दल काहीही पुरावे नाहीत तर अस म्हणता येईल की पाणीपुरीचा शोध मगध मध्ये लागला म्हणजे आजचे बिहार
खाली काही प्रतिमा दिल्या आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा आम्ही असे आश्चर्य कारक आणि अद्भुत लेख आपल्यासाठी लिहित राहू आपल्या मित्रांना शेअर करा

अडचण आहे मला कमेंट करा