Type Here to Get Search Results !

गुळ आणि साखर रोचक माहिती (fact about sugar)

आपण खूप सारे गोड पदार्थ  खातो. साखर ही तर माझ्या खूप आवडीचा पदार्थ आहे.साखर किंवा गूळ आपल्यालाही आवडत असेल. अनेक गोड पदार्थ खात असताना आपल्या मनात कधी हा विचार आला आहे का या साखरेचा या गुळाचा शोध कसा लागला.आजही जो गुळ किंवा साखर आपण रोजच्या जीवनात आपण खातो.तिचा इतिहास किती जुना आहे, तर चला मग जाणून घेऊयात आजच्या या लेखात..







गुळ हा आयुर्वेदिक दृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे.गुळामध्ये खूप सारे असे घटक आढळतात . ज्यामुळे शरीराला अपाय होणार नाही याउलट साखरेमध्ये असा एकही चांगला गुण नाही. आपण ती खायला पाहिजे पण तरीही आजच्या काळात साखरेची सेवन हे सर्वात जास्त होते आणि गुळाला खायचे  टाळले जाते. गुळात रोग प्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणात असते.त्याचबरोबर रक्तदाबाचे प्रमाण देखील गुळाने कमी होते. स्मरण शक्तीत वाढ होते. शरीरातील विषारी तत्व बाहेर पडतात असे अनेक फायदे मुळापासून मिळतात.

जसा कापसाचा शोध भारतात लागलेला आहे.तसाच गुळाचा सुद्धा शोध भारतातच लागलेला आहे आणि त्याचबरोबर साखरेचा ही शोध भारतातच लागलेला आहे.



 रामायणातल्या मेजवानीच्या वर्णनात उसाचे वर्णन आढळते .राम जन्म झाल्यानंतर उंटावरून साखर वाढल्याचा उल्लेख रामायणात आढळतो. अर्थातच सध्या कारखान्यात भेटणारी ती ही  साखर नसेल परंतु साखरेचेच एक अशुद्ध स्वरूप असू शकते. जो  की गुळाचा चूराही असू शकतो.

 भारतात ऊस हे पीक प्राचीन काळापासून घेतले जाते.



इसवी सन पूर्व 300 च्या काळात कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये गुळाचे वर्णन आलेले आहे. सोबतच साखरेचे सुद्धा वर्णन कौटिल्याच्या अर्थशास्त्रात आढळते. त्या काळच्या साखरेचे स्वरूप आजच्या तुलनेत वेगळी असेल परंतु ही गोष्ट वाखाणण्याजोगी आहे, की त्या काळात सुद्धा साखर अस्तित्वात होती.


इसवी सन पूर्व 550 ते 486 या काळामध्ये पर्शिया मध्ये दरायस चे साम्राज्य होते. या दरायसने सिंधू खोर्‍यावर आक्रमण केले, तेव्हा त्याला बांबू सारखा दिसणारा आणि मधमाशा च्या मदतीशिवाय मध देणाऱ्या  या वनस्पतीचा म्हणजेच उसाचा शोध लागला. उसापासून साखर बनवायचं तंत्र त्यांनी भारतातूनच स्वतःच्या मायदेशात नेलं.

गुळ बनण्याच्या पुर्वी एक अवस्था असते. जिला आपण पाक असे म्हणतो आणि पूर्वीच्या काळी परदेशात या पाकाला  मसाल्याच्या पदार्थात मोजले जायचे याचे कारण असे होते की मसाल्यांच्या पदार्थाप्रमाणेच हे देखील खूप पसंद केल्या जायचे. 

रम हा दारूचा एक ब्रांड आहे,जो बाजारात खूप प्रसिद्ध आहे.याची निर्मिती देखील साखरेच्या मळीपासुन होते.ग्रीक आणि लॅटिन भाषेपासून सॅकॅरम हा शब्द तयार झाला सॅकॅरम म्हणजे साखर आणि या साखरेपासून जी दारू तयार होते, हिला रम असे म्हंटल्या जाऊ लागले.



साखरेचा उगम जरी भारतातला असला तरी याला व्यापारीदृष्ट्या जागतिक स्तरावर नेण्याचे काम अनेक देशातील व्यापाऱ्यांनी केलेले आहे. ज्यात अरबी व्यापारी युरोपियन व्यापारी बार्शी ग्रीक अशा अनेक देशातील व्यापाऱ्यांचा समावेश आहे.

पूर्वीच्या काळी जी साखर किंवा जो गुळ बनवला जायचा यासाठी आफ्रिकेतून अनेक कामगार गुलाम स्वरूपात आणले जायचे. आणि त्यांच्याकडून साखरेची गुळाची निर्मिती करून इतर देशात व्यापार केला जायचा. या कामगारांना कोणत्याही प्रकारचे अधिकार नव्हते. त्यामुळे त्यांच्याकडून काम करून घेतल्या जायचे आणि त्या बदल्यात त्यांना कोणताही मोबदला दिला जात नसे.

ज्याप्रमाणे ऊसापासून साखर बनविले जाते. त्याचप्रमाणे खजुरापासून देखील एक प्रकारची साखर बनवल्या जाते.  ही साखर जगातली सर्वात महागडी साखर आहे. ही  साखर खूप कमी प्रमाणात तयार  होते त्यामुळे या साखरेचे उत्पन्न कमी आहे आणि सोबतच ही मिळणे ही खूप कठीण आहे. जर आपल्याकडे खूप सारा पैसा असेल तर मात्र आपण या साखरेचा आनंद घेऊ शकता.

आजच्या काळात जरी आपण पुरणाच्या पोळीत साखरेचा वापर  करत असलो तरी ही पूर्वीच्या काळापासून गुळाचा उपयोग पुरणाच्या पोळीसाठी केला जात असे. आणि आज ही खूप जण पुरणाच्या पोळीत गुळाचा वापर करतात.

गुळाचा रंग हा लाल असतो.या लाल रंग प्राकृतिक आहे  त्याचे शुद्धीकरण केले जाते आणि त्याला पांढऱ्या रंगाचे स्वरूप दिले जाते यासाठी गुळामध्ये सल्फर डाय ऑक्साईड मिसळली जाते सोबतच ब्लिचिंग केली जाते .. हे माणसाच्या शरीरासाठी घातक असते आणि त्या तुलनेत गुळ खूप उपयोगी असतो. यासाठी आणखी एक प्रक्रिया केली जाते ज्यामध्ये कॅल्शियम हायड्रॉक्साइड या मिश्रणाला मिळवून साखरेला पांढरा रंग दिल्या जातो काही साखर कारखान्यामध्ये फॉस्पेटिक ऍसिड किंवा कार्बन-डाय-ऑक्‍साईड यांचा देखील शुद्धीकरण प्रक्रियेमध्ये वापर केला जातो. साखरेला शुद्ध करण्यासाठी गंधकाचा देखील वापर केल्या जातो.

जी साखर आपण घरात खाण्यासाठी वापरतो या साखरेला रासायनिक भाषेत सुक्रोस असे म्हटले जाते. रासायनिक दृष्ट्या साखरही ग्लुकोज आणि फ्रुक्टोज या दोन शर्करांत पासून बनलेली असते.



ऊसानंतर साखरेचे प्रमाण सर्वात जास्त शुगरबीटमध्ये असते. इसवी सन पूर्व 400 मध्ये पाणिनी याने स्वतःच्या ग्रंथात साखर आणि गूळ याची नोंद केलेली आहे त्याने लिहिलेल्या वर्माला साखर आणि गुळाची माहिती मिळते यावरून असे समजले की इसवीसनपूर्व चारशे च्या काळात देखील साखरेचा वापर भारतात होता.

खूप वेळा आपल्या मनात हा प्रश्न आला असेल की साखर गोल का नाही साखरेचे स्फटिक स्वरूपात चौकोनी आकाराचे तुकडे आपल्याला का दिसतात.या प्रक्रियेला स्पष्टीकरण म्हणजेच crystallization असे म्हणतात. ही एक रासायनिक प्रक्रिया आहे.  पदार्थाच्या रेणू वर असणारा विद्युत भार विशिष्ट आकार घडवण्यास महत्त्वाची भूमिका बजावतो. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर साखरेचा रेल्वे हा अशा अनेक रेणूंचा समूह करून तयार झालेला असतो. आणि या कारणांमुळेच साखरेला चौकोन आकार प्राप्त होतो विद्युत् भार यामुळेच हे शक्य होते.

 साखर पाण्यात टाकली की साखरेवर चा विद्युत भार कमी होतो म्हणजेच विद्युत बंध कमकुवत होतो आणि रेणू स्पटिक रचने मधून मुक्त होऊन साखर पाण्यात विरघळते.

आपल्या दैनंदिन जीवनात  खूप सार्‍या धार्मिक आणि अध्यात्मिक लोकांत जेवण झाल्यानंतर बडिशोप आणि साखर यांचे मिश्रण करून खाण्याची पद्धत आहे.

गूळ आणि साखरेची ची माहिती आपल्याला कशी वाटली. आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा .आणि आपले काही सजेशन असल्यास आम्हाला नक्की सांगा .आम्ही त्यावर लक्ष देऊ बाकी मित्र आणि मैत्रिणीना शेअर करा कमेंट करा लवकरच भेटू पुन्हा एकदा धन्यवाद.
















टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

अडचण आहे मला कमेंट करा